दुष्काळाबरोबरच शेतकऱ्यांसमोर जनावरे चोरणाऱ्या टोळ्यांचे संकट

Foto
तळेगाव परिसरात चोरट्यांचा हैदोस : शेतकऱ्यावर चाकू हल्ला करीत गायी पळविण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो):  जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या तळेगाव परिसरात सध्या जनावरे चोरांच्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. शेतात, गोठ्यात बांधलेली शेतकऱ्यांची जनावरे ही टोळी अलगद पळवत आहे.

गेल्या आठ दिवसात दोन ते तीन घटना उघडकीस आल्या आहेत. एका घटनेत तर शेतकऱ्यांने चोरट्यांशी दोन हात केले. मात्र चाकू हल्ला करीत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. दुसरीकडे हसनाबाद पोलीस ठाणे मात्र निव्वळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. रात्रीची गस्त घालून शेतकऱ्यासह जनावरांची सुरक्षा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

जिल्ह्यात सध्या दुष्काळाची तीव्र सावट आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पाऊस गायब असल्याने शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले. कपाशीसह मका, तूर, सोयाबीन, बाजरी आदी पिके पावसाअभावी वाळली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दुसरीकडे पाणीसाठाच नसल्याने परिसरातील विहिरींनी तळघटला आहे.

तर तलाव, नदी, नाले कोरडे ठाक आहेत. येत्या काळात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची चिन्हे तळेगाव आणि परिसरात निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटातून कसे सावरावे या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता जनावरे चोरणाऱ्या टोळीचे संकट उभे ठाकले आहे. तळेगाव येथील संशयित जखमींचा पोलिसांकडून शोध
घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्याऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

 याप्रकरणी अज्ञात ४ ते ५ चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली हसनाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांनी सांगितले की, घटना गंभीर असून शेतकऱ्याच्या प्रतिकारात एका चौराचा हात फ्रैंक्चर झाल्याची माहिती आहे. 

त्यामुळे परिसरातील रुग्णालये तसेच संशयित व्यक्तीवर पोलिसांचे लक्ष असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. परिसरातील रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पशुधन चोरीच्या घटनांना आळा घालून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

-- तातडीने कारवाईचे आदेश -- 
दरम्यान पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी तातडीने भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पीआय उबाळे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. दुसरीकडे हसनाबाद ठाण्याचे पीआय उबाळे यांनी सांगितले की, जनावरे चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

या भागात पेट्रोलिंग वाढवून चोरट्यांना तातडीने जेरबंद केले जाईल.  अण्णा गव्हाड यांच्या चार बकऱ्या चोरट्यांनी लंपास केल्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. बकऱ्यांचा आवाज आल्याने अण्णा गव्हाड घराबाहेर आले असता त्यांना गोठ्यात बांधलेला चार बकऱ्या लंपास झाल्याचे दिसून आले. ही घटना ताजी असतानाच पिंपळगाव कोलते येथे गोठ्यातून तीन दुधाळ गायी चोरून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. 

दोन दुचाकीवर चोरटे आले होते. मात्र चोरटे आल्याची चाहूल रात्री गोठ्यात चोरांची चाहल कोलते पिपळगाव येथील तरुण शेतकरी मंगेश सोळुंके हैं नेहमीप्रमाणे गावातून जेवण करून रात्री शेतातील गोठ्यात झोपण्यासाठी गेले होते. रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ते गोठ्यात मोबाईल पाहत बसले असताना त्यांना जनावरांच्या हालचालीचा व संशयास्पद आवाज आला, चौकशी केली असता ४ ते ५ अज्ञात व्यक्ती गोठ्यात शिरून तीन दुधाळ गायीचे दोरखंड कापून त्याना चोरून नेण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

लागताच शेतकरी सावध झाला. शेतकऱ्याने बाहेर येऊन पाहिले असता चोरट्यांनी दोन गाईंची दावे तोडली होती. चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुण शेतकऱ्यावर लाठ्या-काठ्या व चोरांनी धारदार
शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मंगेश रमेश सोळंके हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मंगेश यांनी केलेल्या जोरदार प्रतिकारात एका चोराचा हात फ्रैक्चर झाल्याची माहिती आहे.

-- गावकरी येताच चोरांचा पळ -- 
मंगेश यांचा फोन मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकरी मोठ्या संख्येने जमा होत असल्याचे लक्षात येताच बौरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चौरांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केलेल्या दुधाळ गायी मात्र चोरानी चोरून ने गोठधातच सोडून दिल्या.

-- चोरांचा हल्ला; शेतकऱ्याचा प्रतिकार -- 
मंगेश यांनी विरोध करताच चोरांनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. एकट्या मंगेश यांनीही न घाबरता चोरांचा प्रतिकार केला. या झटापटीत मंगेश यांच्या प्रतिहल्ल्यात एका चोराचा हात फॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, चोरांनी केलेल्या मारहाणीत मंगेश गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी धैर्य न गमावता फोन करून गावक-यांना घटनेची माहिती दिली.